मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 17:41 IST2020-07-15T17:41:01+5:302020-07-15T17:41:19+5:30
मालेगाव : शहरातील आझादनगर भागात चहाच्या टपरीवर चहा पित असताना मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण झाली असून जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद मोहंमद सुलतान मोहंमद सुलेमान (२६) रा. इस्लामाबाद शाळेजवळ, ग. नं. ८ यांनी पवारवाडी पोलिसात दिली.

मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
मालेगाव : शहरातील आझादनगर भागात चहाच्या टपरीवर चहा पित असताना मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण झाली असून जीवे ठार मारण्याचा दम दिल्याची फिर्याद मोहंमद सुलतान मोहंमद सुलेमान (२६) रा. इस्लामाबाद शाळेजवळ, ग. नं. ८ यांनी पवारवाडी पोलिसात दिली. पोलिसांनी सलमान (पूर्ण नाव माहीत नाही) विरोधात गुन्हा दाखल केला. काल मंगळवारी पहाटे पाऊण वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी मोहंमद सुलतान व त्याचा मित्र शेरू आझादनगर चहाच्या टपरीवर चहा पित असताना आरोपी सलमान तेथे आला. त्याने शिवीगाळ, मारहाण केली. अधिक तपास हवालदार पगारे करीत आहेत.