शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

खात्यावरील १० हजार परस्पर काढले

By admin | Updated: November 17, 2016 00:21 IST

तक्र ारीनंतर भरणा : करंजाळीतील महाराष्ट्र बॅँकवादाच्या भोवऱ्यात

 पेठ : तालुक्यातील करंजाळी येथील महाराष्ट्र बँकेचे ग्राहक नारायण चौधरी यांच्या खात्यातील दहा हजार रूपयांचे गूढ वाढले असून, तक्र ारदार पोलीसात जाताच रक्कम खात्यात जमा झाल्याचा प्रकार झाल्याने बॅक व्यवस्थापनच वादात सापडले आहे .याबाबतचे वृत्त असे की करंजाळी येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेत कार्यक्षेत्रातील उस्थळे (फणस पाडा) येथील नारायण तुकाराम चौधरी याचे खाते (क्र. २५०३५७९९२६२) आहे. त्यांचे खात्यावर दि ३१ मार्च अखेर, २६ हजार ८११ रुपये शिल्लक होती. त्यातून दि. २२ रोजी १० रुपये काढण्यात आले होते. खात्यावरील उर्वरीत रक्कम काढण्यासाठी चौधरी दि. १३ नोव्हेंबर रोजी बँकेत गेले असता त्यांना तुमच्या खात्यात काहीही रक्कम नसल्याचे सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला. अत्यंत हवालदिल झालेलया चौधरी यांना बॅँक व्यवस्थापना कडून सहकार्य मिळण्या ऐवजी तुमच्या खात्यातून एटीएम मधून पैसे काढल्याचे सांगण्यात आले. एटीएम म्हणजे काय ? याची माहिती नसलेले चौधरी रडू लागल्याने बॅँकेत ग्राहक म्हणुन आलेल्या एका ग्राहकाने आपुलकीने सर्व घटना समजून घेऊन त्यास पोलीसांकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे नारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे गाठुन हवालदार जाधव यांनी सर्व घटनाक्रम समजून घेऊन चौधरी यांचा तक्रारी अर्ज घेतला. याची खबर बँक व्यवस्थापनास लागताच चौधरींच्या खात्यावर दहा हजार रूपये जमा झाल्याचा प्रकार तपासकामी गेलेल्या हवालदार जाधव व महाले यांच्या निर्दशनास आला. चौधरी यांचेकडे एटीएम नसतांना ६०७३८५३३३३६३४८ या क्रमांकाच्या कार्डवरूण दि. १८ व २६ आक्टोबर रोजी प्रत्येकी ५ हजार रुपये काढण्यात आल्याचे आढळून आले. (वार्ताहर)