पाणी योजनांतील त्रूटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:48 IST2019-01-16T17:48:40+5:302019-01-16T17:48:53+5:30

सिन्नर : दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर्तीवर या योजनेसाठी देखील एक्सप्रेस फिडरने वीजपुरवठा करा, अशी मागणी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे केली.

Remove the water schemes problems | पाणी योजनांतील त्रूटी दूर करा

पाणी योजनांतील त्रूटी दूर करा

सिन्नर : दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर्तीवर या योजनेसाठी देखील एक्सप्रेस फिडरने वीजपुरवठा करा, अशी मागणी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे केली.
सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, निमगाव सिन्नर, केपानगर व हिवरगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमवेत कोकाटे यांनी सोमवार (दि. १४) रोजी मजीप्रच्या नाशिक येथील कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांची भेट घेवून तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची सद्यास्थिती जाणून घेतली.
कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाºया गावांसाठी जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाºया योजना फायदेशीर असल्या तरी त्यांच्या संचालनाकडे आवश्यक त्या प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले. बारागावपिंप्री योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर होणे आवश्यक आहे. योजनेत समाविष्ट गावांमध्ये जलकुंभ उभारणीसह गावांतर्गत जलवाहिन्या टाकणे आवश्यक आहे. वस्त्यांवर देखील पाणीपुरवठ्यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना कोकाटे यांनी केली. वावी व वडांगळी धरतीवर आठ तासांचे पंपिंग हावर्स गृहीत धरून एक्सप्रेस फिडरसाठी महावितरणामार्फत जिल्हाधिकाºयांमार्फत प्रस्ताव पाठवावा, असे ते म्हणाले.

Web Title: Remove the water schemes problems

टॅग्स :Waterपाणी