वणी येथे ११ अतिक्रमणे काढली

By Admin | Updated: May 10, 2014 19:47 IST2014-05-10T16:50:57+5:302014-05-10T19:47:25+5:30

वणी - ग्रामपालिकेच्या जागेतील अकरा (११) अतिक्रमने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली तर हनुमान मंदिर परिसरातील तीन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली आहे.

Removal of 11 encroachers at Wani | वणी येथे ११ अतिक्रमणे काढली

वणी येथे ११ अतिक्रमणे काढली

वणी - ग्रामपालिकेच्या जागेतील अकरा (११) अतिक्रमने पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली तर हनुमान मंदिर परिसरातील तीन अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली आहे.
वणी ग्रामपालिकेच्या जागेतील वाढत्या अतिक्रमणामुळे ग्रामपालिकेने थेट पोलीस अधीक्षकाकडे राज्य राखीव दलाच्या तुकडीची मागणी केली होती. पोलीस अधीक्षक संजय मोहिते व वणी पो ठाण्याचे सोपन शंकर बाबर यांच्या चर्चेअंती वणी, अभोणा व कळवण पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी व वीस कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव, तलाठी महेश भोये उपसरपंच किरण गांगुर्डे एक जेसीबी व ग्रामपालिकेचे कर्मचारी असा लवाजमा आज सकाळी वणी-मुळाणा रस्त्यावरील इंदिरानगर भागात पोहचला व या ठिकाणचे दोन घरे दोन अर्धवट स्थितील घरे व सात पायाचे बांधकाम जेसीबीच्या सा‘ाने भुईसपाट करण्यात आले. दरम्यान, या कारवाईच्या वेळी अतिक्रमणधारकांनी पक्षपातीपणाचा आरोप केला. तद्नंतर स्मशानभूमी परिसरातील हनुमान मंदिरालगतच्या तीन अतिक्रमणधारकांच्या घरांवर नोटीस लाऊन अतिक्रमणे काढण्यासाठी चोवीस तासांची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: Removal of 11 encroachers at Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.