आंबेगण ते सावळघाट राष्टÑीय महामार्गाची दूरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:03 IST2020-07-21T21:17:48+5:302020-07-22T01:03:01+5:30
पेठ : नाशिक ते गुजरात हा राष्ट्रीय महामार्ग कॉक्र ीटीकरण झाला असतांना आंबेगण ते सावळघाटाच्या माथ्यापर्यंत यापुर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची मात्र दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक ते पेठ या जवळपास ५० किमी राष्ट्रीय महामार्गाचे नुतनीकरण करण्यात आले असून मनपा हद्द ते पिंपळणारे फाटा व आंबेगण ते सावळघाट या दरम्यान डांबरीकरण केलेला रस्ता दरवर्षी खराब होत आहे.

आंबेगण ते सावळघाट राष्टÑीय महामार्गाची दूरवस्था
पेठ : नाशिक ते गुजरात हा राष्ट्रीय महामार्ग कॉक्र ीटीकरण झाला असतांना आंबेगण ते सावळघाटाच्या माथ्यापर्यंत यापुर्वी डांबरीकरण झालेल्या रस्त्याची मात्र दुरवस्था झाली आहे. राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाकडून नाशिक ते पेठ या जवळपास ५० किमी राष्ट्रीय महामार्गाचे नुतनीकरण करण्यात आले असून मनपा हद्द ते पिंपळणारे फाटा व आंबेगण ते सावळघाट या दरम्यान डांबरीकरण केलेला रस्ता दरवर्षी खराब होत आहे. आंबेगण, गोळशी फाटा व सावळघाटाच्या माथ्यावर महामार्गावर मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. उर्वरित रस्ता कॉक्र ीटीकरण झाल्याने वाहनांची वर्दळ वाढली आहे. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा औद्योगिकदृष्टया जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. केवळ ६ किमी अंतरासाठी प्रवाशांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत असल्याने आंबेगण ते सावळघाट हा रस्त्याचेही कॉक्र ीटीकरण करण्यात यावे अशी मागणी प्रवाशी व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.