महात्मा गांधींसह हुतात्म्यांचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:49+5:302021-02-05T05:41:49+5:30
नाशिक महापालिकेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी दोन मिनिटे मौन बाळगून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्यांना ...

महात्मा गांधींसह हुतात्म्यांचे स्मरण
नाशिक महापालिकेच्या वतीने महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी दोन मिनिटे मौन बाळगून देशासाठी प्राणार्पण करणाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
गंगापूररोडवरील कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालयात अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाशिक्षक जितेंद्र शिंदे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक जयवंत बोढारे, पर्यवेक्षक रमेश बागुल, शिक्षक प्रतिनिधी सुजाता पवार उपस्थित होते. यावेळी प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर काही विद्यार्थ्यांनी माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे वाचन केले. जयवंत बोढारे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मनीषा गांगुर्डे यांनी, तर आभारप्रदर्शन प्रमोद पाटील यांनी केले.
जी. डी. सावंत महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेचे सचिव अशोक सावंत यांनी प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी प्रा. दर्शन पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यालयाला उजाळा दिला. कार्यक्रमास प्राचार्या रोहिणी पवार, प्रा. चव्हाण यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होेते.
फोटोवर ३० एनएमसी, ३० केबीएच, ३०सावंत