आराई येथे शिवस्वराज्य दिन दिमाखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:53 IST2021-06-08T00:52:50+5:302021-06-08T00:53:18+5:30

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात साजरा करण्यात आला.

Remember Shivswarajya Day at Arai | आराई येथे शिवस्वराज्य दिन दिमाखात

आराई येथे शिवस्वराज्य दिन दिमाखात

ठळक मुद्दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज दंडाचे ब्राम्हणाकरवी विधीवत पूजन

जुनी शेमळी : बागलाण तालुक्यातील आराई येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकनियुक्त सरपंच मनिषा अहिरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज दंडाचे ब्राम्हणाकरवी विधीवत पूजन करुन त्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जवळ आणण्यात आले. छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून मानवंदना देण्यात आली.
यावेळी माजी सरपंच माधव अहिरे, डॉ. गोकुळ अहिरे, केदाजी अहिरे, परशुराम अहिरे, देविदास अहिरे, सुधाकर भामरे, साधना अहिरे, देवूबाई माळी, सुरेश अहिरे, धना बोरसे, शिवाजी भोसले, राजेंद्र जाधव, स्वप्निल अहिरे, राहुल पानपाटील, दिनेश गायकवाड, वसंत भदाने, गौतम गरुड, बाजीराव महिरे, राजेंद्र सोनवणे, भाऊसाहेब अहिरे, तेजस अहिरे, आदी हजर होते. 

Web Title: Remember Shivswarajya Day at Arai