रिमांड होममधील मुलांसाठी ‘देऊळबंद’
By Admin | Updated: August 4, 2015 22:24 IST2015-08-04T22:23:59+5:302015-08-04T22:24:25+5:30
रिमांड होममधील मुलांसाठी ‘देऊळबंद’

रिमांड होममधील मुलांसाठी ‘देऊळबंद’
नाशिक : विज्ञान आणि अध्यात्म यांचा मेळ असलेला ‘देऊळबंद’ चित्रपट रिमांड होममधील मुलांना दाखविण्यात आला.
माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते चित्रपटाच्या या खेळाचा शुभारंभ झाला. यावेळी आमदार सीमा हिरे, माजी उपमहापौर शोभा छाजेड, नगरसेवक आकाश छाजेड, कोंडाजीमामा आव्हाड, अश्विनीताई बोरस्ते, प्रितीश छाजेड, चंदुलाल शहा, डॉ. प्रमोद गिरासे, आशिष छाजेड, जयप्रकाश जातेगावकर, सुनील आव्हाड, यशवंत पाटील, प्रवीण खाबिया, अमित बोरा, दामोदर मानकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)