शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रातीली कामगारांची पूरग्रस्तांना मदत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 14:12 IST

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंपनीच्या  कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

नाशिक : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंपनीच्या  कामगारांनीही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. सातपूर येथील सीएट एम्प्लॉईज को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीने गुरुवारी (दि.२३) पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदतीचा धनादेश दिला आहे.  सीएट एम्प्लॉईज को-आॅपरेटीव्ह क्रेडिट सोसाटीतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सराकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पुढाकार घेऊन सोसायटीच्या सभासदांनी पुन्हा सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. सोसायटीेच्या पदाधिकारी व सभासदांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना हा ५१ हजार रुपयांच्या मदतनिधीचा धनादेश सुपर्द केला आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन नितिन दवे, सहसचीव सागर शिंदे, युनियन अध्यक्ष भिवाजी भावले, सचीव  कैलास धात्रक, सोसायटीचे सचीव अंकुश कोडग, व्हाईस चेअरमन राजाराम ईखे,  खजिनदार भरत सांगळे, संचालक दशरथ चौबे, संचालक अरूण लांडगे संचालक योगेश दोंदे  संजय रासकर यांच्यासह सोसायटी कर्मचारी उपस्थित  होते.

 

टॅग्स :floodपूरNashikनाशिकkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSatara Floodसातारा पूर