वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा बोडके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:38 IST2020-01-23T23:23:08+5:302020-01-24T00:38:20+5:30
सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा संतोष बोडके याची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा बोडके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मावळत्या सरपंच शोभा बोडके. समवेत संजय नांगरे, अंबादास बोडके, अलका बोडके, छाया नांगरे, मंदा ठोंबरे, अर्जुन बोडके, तुषार आंबेकर, भीमराव दराडे यांच्यासह ग्रामस्थ.
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेखा संतोष बोडके याची बिनविरोध निवड करण्यात आली.
सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून सरपंच शोभा बाजीराव बोडके यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागेसाठी निवड करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळ अधिकारी एम.एन. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक मंडळ अधिकारी आर. बी. लोणारे, तलाठी के. आर. देशमुख, ग्रामसेवक पांडुरंग सोळंके, स्वरूप गोराणे यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. निर्धारित वेळेत रेखा बोडके यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी गाडे यांनी रेखा बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या सरपंच शोभा बोडके, सदस्य संजय नांगरे, अंबादास बोडके, अलका बोडके छाया नांगरे, उपसरपंच मंदा ठोंबरे सदस्य तुषार आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.