रस्त्यावरील विक्रेत्यांचा मंडईत स्थलांतरास नकारच
By Admin | Updated: May 10, 2017 00:29 IST2017-05-10T00:29:07+5:302017-05-10T00:29:42+5:30
सातपूर : रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मंडईतील भाजीविक्रे त्यांनी सोमवारी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

रस्त्यावरील विक्रेत्यांचा मंडईत स्थलांतरास नकारच
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : सातपूर गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मंडईतील भाजीविक्रे त्यांनी सोमवारी मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन तत्कालीन विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. या विक्रेत्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा, सणासाठी बसणाऱ्या
विक्रेत्यांनादेखील मंडईत बसविण्यात यावे, पार्किंगची सोय करावी, मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या मागणीची दखल घेत तत्कालीन विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मंडईतील अतिरिक्त जागेची मोजणी करून जागेची आखणी केली होती. आखणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाजीविक्रेत्या व्यावसायिकांकडून सहकार्य करण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच दिवसांंचा कालावधी उलटला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. म्हणून सोमवारी (दि.८) पुन्हा मंडईतील भाजीविक्रे त्यांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन मंडई बाहेरील भाजीविक्रे त्यांना मंडईत स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. यावेळी नगरसेवक सीमा निगळ, दीक्षा लोंढे यांच्यासह शंकर पाटील, दत्तात्रय मोराडे, संदीप आव्हाड, बाळू सांगळे, अण्णासाहेब पाटील, लीलाबाई पिंगळे, योगेश बैरागी, मथुरा उबाळे, विमल काश्मिरे, चंद्रिका प्रसाद, लता काठे, संतोष भंदुरे, अंजना बैरागी, धर्मा
वडनेरे आदिंसह भाजीविक्रेते उपस्थित होते.