शिक्षण मंडळाकडून टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:21+5:302021-03-13T04:26:21+5:30

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील ...

Reimbursement of examination fees to scarcity students from the Board of Education | शिक्षण मंडळाकडून टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती

शिक्षण मंडळाकडून टंचाईग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती

नाशिक : राज्यातील २०१७-१८, २०१८- १९ व २०१९-२० या तीन शैक्षणिक वर्षात दुष्काळग्रस्त, टंचाईग्रस्त, अथवा अवकाळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ऑनलाईन पद्धतीन आधार संलग्न बँक खात्याची माहिती तत्काळ मागविण्यात आली आहे.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत परीक्षा शुल्क माफीस पात्र तथा अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाने केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये अवेळी पावसामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांनाही राज्य मंडळांने सूचित केले असून याविषयीची सविस्तर माहिती मंडळाच्या ‘फी रिफंड’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून शाळांनी व कनिष्ठ महाविद्यालयांनी ही माहिती विद्यार्थीनिहाय भरून संकेतस्थळ‌ावर सबमिट केल्यानंतर यादीच्या शेवटी देण्यात आलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक, प्राचार्य यांना स्वाक्षरीसह प्रमाणित करून अपलोड करावे लागणार आहे. यानुसार बँक खात्याचा तपशील प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सोमवारपर्यंत (दि. १५) ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

इन्फो-

प्रतिपूर्तीचा लाभ थेट बँक खात्यात

परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती ही राज्यमंडळ स्तरावरून एनईएफटी अथवा आरटीजीएसद्वारे विद्यार्थ्यांच्या अथवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ही माहिती वेळत राज्य मंडळाला मिळणे आवश्यक आहे. ही वेळत उपलब्ध न झाल्यास या लभापासून विद्यार्थी वंचित राहणार असल्याने संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिपूर्ण माहिती निर्धारित कालवधीत मंडळाला सादर करण्याच्या सूचना विभागीय मंडळाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केल्या आहेत.

Web Title: Reimbursement of examination fees to scarcity students from the Board of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.