पंचवटी : श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. संध्याकाळी पौर्णिमेला प्रारंभ झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे, तर मंगळवार (दि.१२) कृत्तिका नक्षत्राला प्रारंभ होत असून, बुधवारी (दि.१३) रात्री १० वाजून १ मिनिटापर्यंत नक्षत्र आहे; त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
सोमवारी सकाळी मंदिरात मंदिर विश्वस्तांच्या हस्ते देवाला दूध, दही, ऊस, नारळ रस आदींसह फळे आणि द्रव्यांचा अभिषेक करण्यात आला. मुख्य पूजन झाल्यावर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनातर्फे पूर्व दरवाजाने आत सोडण्याची सोय करण्यात आली होती.
मंदिराबाहेर पूजा साहित्य विक्री करणाºया व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सकाळपासून भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कार्तिक पौर्णिमेला महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.
कार्तिक स्वामी पौर्णिमानिमित्त कार्तिक स्वामींना मोरपीस वाहण्याची परंपरा आहे. कार्तिक स्वामींचे वाहन मोरपक्षी आहे. त्यामुळे मोरपीस अर्पण केल्यावर मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जात असल्याने भाविक दर्शनासाठी जाताना मोरपीस घेऊन जातात. गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यातील मोरपीस विक्र ेते मंदिर परिसरात दाखल झाले होते. १० ते १५ रुपये मोरपीसाची विक्र ी केली जात होती.
Web Title: Rehag to visit devotees at Kartik Swami Temple
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.