नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 00:22 IST2019-12-02T00:21:28+5:302019-12-02T00:22:25+5:30

सिन्नर : नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते आणि सुखी जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते, असे प्रतिपादन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी केले.

 Regular medical check-ups increase a person's life expectancy | नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते

नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते

ठळक मुद्देनियमित आरोग्य तपासण्या आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते आणि सुखी जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते, असे प्रतिपादन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी केले.
महाराष्टÑ शासनाच्या दीर्घकालीन सरदवाडी येथे आरोग्य तपासणी शिबिरात रुग्णांची तपासणी करताना दोडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी.नियमित आरोग्य तपासण्या आवश्यकधोरणान्वये ‘राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम व पोषण आहार अभियान अंतर्गत पास्तेच्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या वतीने तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. सरपंच कविता बोकड अध्यक्षस्थानी होत्या. आरोग्य शिबिरात ३० वर्षांवरील स्री-पुरुषांचे रक्तदाब, मधुमेह, एचआयव्ही, हिमोग्लोबीन, रक्तगट, थाइरॉइड आदी तपासण्या करण्यात आल्या. तपासणीचा ७० लाभार्थींनी लाभ घेतला. त्यापैकी उच्च रक्तदाब ५ व मधुमेह ७ अशा एकूण १२ रुग्णांना दोडीच्या ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रास्ताविक विलास बोडके यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ तेल्हुरे यांनी केले. आभार पूनम गायकवाड व विठ्ठल केदार यांनी मानले.
यावेळी सरपंच कविता बोडके, समुपदेशक राजकुमार आणेराव, राहुल शेळके, अरुण बोकड, बाबूराव शिरसाठ, अर्चना शेळके, आशा शिरसाठ आदींसह आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी उपस्थित होत्या. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title:  Regular medical check-ups increase a person's life expectancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.