साहसी क्रीडा प्रकार प्रशिक्षण आयोजक संस्थांना नोंदणी सक्तीची

By Admin | Updated: August 8, 2014 01:23 IST2014-08-05T21:16:01+5:302014-08-08T01:23:38+5:30

साहसी क्रीडा प्रकार प्रशिक्षण आयोजक संस्थांना नोंदणी सक्तीची

Registration is mandatory for adventure sports type training organizer organizations | साहसी क्रीडा प्रकार प्रशिक्षण आयोजक संस्थांना नोंदणी सक्तीची

साहसी क्रीडा प्रकार प्रशिक्षण आयोजक संस्थांना नोंदणी सक्तीची

 

नाशिक : ट्रेकिंगसह विविध साहसी क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण देणाऱ्या तसेच आयोजन करणाऱ्या सर्व संस्थांनी जिल्हा क्रीडा विभागाकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी दिली़
राज्यामध्ये ट्रेकिंगसह माऊंटनिअरिंग, स्किर्इंग, स्नो बोर्डिंग, पॅरासेलिंग, हँगग्लायडिंग, पॅराग्लायडिंग व सर्व प्रकारच्या जलक्रीडांचे काही संस्थांकडून आयोजन केले जाते; परंतु यासाठी पुरेशी वैद्यकीय साधनसामग्री, सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात नाहीत़ याबाबत उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य शासनाला साहसी उपक्रमांबाबत धोरण व मार्गदर्शक सूचना देण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार शासनाने साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांची नोंदणी जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे करण्याचे बंधनकारक केले आहे, तसेच या संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्या आहेत़ नोंदणी न करणाऱ्या संस्थांवर शासन कारवाई करणार असल्याने अशा संस्थांनी तातडीने नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे़
 

Web Title: Registration is mandatory for adventure sports type training organizer organizations