बीएलओंकडून नोंदणीचे काम सुरू घरोघरी जाऊन नोंदणी : ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:44 IST2017-11-17T00:43:28+5:302017-11-17T00:44:59+5:30
नाशिक : मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय केंद्रस्तरीय अधिकाºयांनी बुधवारपासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. शिक्षकांना या कामातून वगळावे अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यापार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार आहे.

बीएलओंकडून नोंदणीचे काम सुरू घरोघरी जाऊन नोंदणी : ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार
नाशिक : मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय केंद्रस्तरीय अधिकाºयांनी बुधवारपासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. शिक्षकांना या कामातून वगळावे अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यापार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १५ ते ३० नोव्हेंबर यादरम्यान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम करतील. त्यात प्रत्येक मतदाराची घरोघरी जाऊन खात्री पटविण्याबरोबरच नवीन नाव नोंदणे, दुबार व मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीसाठी छायाचित्रं गोळा करणे, मतदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करणे आदी कामे या काळात करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु या कामासाठी शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. बुथनिहाय मतदार यादीचे वाटप सध्या शालेय परीक्षेचे काम सुरू असताना त्यात मतदार यादीचे काम सोपविल्याने शिक्षकांनी नकार दिला होता. परंतु निवडणूक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने अखेर बुधवारपासून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय त्यांना मतदार यादीचे वाटप करण्यात आले असून, त्यानुसार आता ते घरोघरी जातील. ३० नोव्हेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणीची अखेरची संधी आहे. आता नाव नोंदलेल्या मतदारांची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध होणार आहे.