दारू पिण्यास पैसे देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 08:52 PM2021-09-16T20:52:06+5:302021-09-16T20:53:59+5:30

मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Refuse to pay for alcohol | दारू पिण्यास पैसे देण्यास नकार

दारू पिण्यास पैसे देण्यास नकार

Next
ठळक मुद्देमालेगावी एकावर तलवारीने हल्ला

मालेगाव : शहरातील हुडको भागात रिक्षास्टॅण्डजवळ दारू पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांत आरोपी नदीम शेख इकबाल, रा. हजारखोली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेख इम्रान शेख अतिकुर्ररहेमान (वय ३१, रा. खड्डाजीन) यांनी फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादीचा भाऊ जाकीर शेख याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने फिर्यादीच्या भावास मारहाण केली तसेच तलवारीने डोक्यावर व कपाळावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी त्यास सोडविण्यास आला असता त्याच्यावरही तलवारीने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.

Web Title: Refuse to pay for alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app