शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन गुणांकनातील मानवी चूक प्रकरणातील दंडाच्या रक्कमेत कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:54 IST

महाविद्यालीन परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुणे विद्यापीठाचा दिलासादायक निर्णयऑनलाईन गुणांकनात मानवी चुक प्रकरणात दंडाच्या रक्कमेत कपात महाविद्यालयांसह प्राध्यापकांनाही मिळणार दिलासा

नाशिक : महाविद्यालीन विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास होणाऱ्या दंडाच्या तरतुदीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारणा करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये यापूर्वी आकारला जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. सुधारित तरतुदीनुसार प्राध्यापक अथवा महाविद्यालयांकडून अशी मानवी चूक घडल्यास पाच हजार रुपयांऐवजी केवळ एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना परीक्षेचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास दंडात्मक तरतूद होती. यापूर्वी परीक्षांचे अंतर्गत गुण ऑनलाइन भरताना मानवी चूक झाल्यास प्राध्यापक किंवा महाविद्यालयास सुमारे पाच हजार रुपये दंड होता. तसेच पुढील दोन वर्षे प्राध्यापक किंवा महाविद्यालयास विद्यापीठाकडून वर्धापन दिनी दिल्या जाणाऱ्या व्यक्तिगत पुरस्कारांपासून व विविध योजनांसाठी अर्ज करता येत नव्हता. विद्यापीठाच्या आता घेतलेल्या निर्णयामुळे यापुढे संबंधित प्राध्यापक, महाविद्यालयास विद्यापीठापासून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार आणि विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार नाही. या निर्णयामुळे प्राध्यापक, महाविद्यालयांना दिलासा मिळणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर तांत्रिक चुका होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ, पैसे खर्च होण्यासह  मनस्तापाला सामोरे जावे लागते. परंतु विद्यापीठाच्या या चुकांना एक रुपयाही दंड आकारला जात नाही. प्राध्यापक अथवा महाविद्यालयांकडून एखादी मानवी चूक झाल्यास दंडात्मक कारवाई का? अशी भूमिका होती. अन्यायकारक बाबीवर व्यवस्थापन परिषदेने निर्णय घेत शिक्षा सौम्य केल्याने प्राध्यापक व महाविद्यालयांनाही दिलासा मिळाला आहे.-डॉ. नंदू पवार, अधिसभा सदस्य, पुणे विद्यापीठ  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकuniversityविद्यापीठPuneपुणेSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेStudentविद्यार्थीProfessorप्राध्यापकcollegeमहाविद्यालय