शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

रामकुंडात जलवाहिनी टाकण्यात ‘रेड सिग्नल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:14 IST

रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. अर्थात, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला नसला तरी तूर्तास तो स्थगित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीची बैठक : दंडमाफीच्या विषयावरही चर्चा 

नाशिक : रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च करून जलवाहिनी टाकण्याच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या प्रस्तावाला संचालक मंडळाच्या बैठकीत रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. अर्थात, हा प्रस्ताव रद्द करण्यात आला नसला तरी तूर्तास तो स्थगित करण्यात आला आहे. गंगापूररोडवरील जुन्या पंपिंग स्टेशनसमोर जुने पंचवटी पंपिंग स्टेशन आहे. येथून जाणाऱ्या रॉ वॉटर पाइपलाइनमधून रामकुंडापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव कंपनीने मांडला होता. मात्र, इतक्या लांबून पाणी आणण्याऐवजी पंचवटी येथेच मखमलाबादनाका येथील जलकुंभातून रामकुंडात जलवाहिनीद्वारे पाणी घेण्याचा नवा प्रस्ताव यानिमित्ताने चर्चेत आला आहे. दरम्यान, स्मार्टरोडच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकेदाराला करण्यात आलेला दंड कंपनीच्या सीईओंनी माफ केल्याने हा विषयदेखील चर्चेत आला. मात्र या संदर्भात पुढील बैठकीत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.नाशिकस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची बैठक शुक्रवारी (दि. २४) कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.कंपनीच्या वतीने रामकुंडात सदैव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गंगापूररोडवर कुसुमाग्रज उद्यानालगत असलेल्या जुन्या पंपिंग स्टेशनमधून जाणारे जलवाहिनीचे पाणी रामकुंडात आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीदेखील ही सूचना योग्य असल्याचे सांगितले त्यामुळे यासंदर्भात व्यवहार्यता पडताळणी करून हा प्रस्ताव पुन्हा कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडावा आणि दुसºया पर्यायांचाही विचार करावा, अशी सूचना कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी केली. त्यावर कुंटे यांनी संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत या संदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले दरम्यान या बैठकीत कंपनीचे आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. तसेच कंपनीचे संचालक म्हणून स्थायी समिती सभापती गणेश गिते यांची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली.९५ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावितजलवाहिनीद्वारे हे पाणी रामकुंडात आणण्यासाठी सुमारे ९५ लाख ९२ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या संदर्भात कंपनीचे संचालक गुरमित बग्गा व शाहू खैरे यांनी त्यास विरोध केला सध्या रामकुंडात रामवाडी येथील जलकुंभातून पाणी पुरविले जाते मात्र त्यापेक्षा दूरवरील अंतरावरून पाणी आणणे परवडणार नाही त्यापेक्षा महापालिकेच्या जुना विभागीय कार्यालयाच जागेत २४तास पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ बांधण्यात येणार आहे. तेथून जलवाहिनी टाकून रामकुंडात पाणी घेतल्यास अत्यल्प खर्चात हे काम पूर्ण होऊ शकते, असे बग्गा यांनी सांगितले. जवळच असलेल्या इंद्रकुंड येथूनही अशाप्रकारची जलवाहिनी टाकता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.ठेकेदारांस दंडनाशिकमध्ये गाजलेल्या त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या स्मार्टरोडच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल ठेकेदारास कंपनीने ३६ हजार रुपये प्रतिदिन असा दंड करण्यात आला होता, मात्र फेब्रुवारी महिन्यापासून हा खर्च हा दंड रद्द करण्यात आला आहे. त्याबद्दल महापौर सतीश कुलकर्णी यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना जाब विचारला, मात्र रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. केवळ विद्युत पुरवठ्याअभावी काही काम थांबले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील ई-टॉयलेट अन्यत्र स्थलांतरित करण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यामुळे आता रस्त्याच्या कामाला ठेकेदाराचा विलंब कारणीभूत नाही. त्यामुळे हा दंड स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकSmart Cityस्मार्ट सिटी