लाल कांदा दरात घसरण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 13:01 IST2019-12-19T13:00:56+5:302019-12-19T13:01:09+5:30
लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारच्या तुलनेत कमाल भावात ४०० रूपयांची घसरण झाली.

लाल कांदा दरात घसरण सुरूच
लासलगांव : येथील बाजार समितीत बुधवारच्या तुलनेत कमाल भावात ४०० रूपयांची घसरण झाली. सकाळी ९६५२ रूपये कमाल भाव जाहीर झाला. आज ७६२ वाहनातून ७८६२ क्विंटल लाल कांदा २५०० ते ९६५२ रूपये सर्वाधिक तर ५९०० रूपये सरासरी भाव जाहीर झाला. बुधवारी ५५० वाहनातील लाल कांदा ३००० ते १०७५१ रुपये तर सरासरी ६६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. बाजार समितीत मंगळवारी (दि.१७) बाजार समितीत लाल कांद्याला ११,१११ रुपये हा दर जाहीर झाला होता. सरासरी दराची पातळी ७५०० रुपये होती. सोमवारच्या तुलनेत सकाळी ११०० रुपये कांदा दरात वाढ झाली. ८१५ वाहनांतील ८३३० क्विंटल लाल कांदा किमान ३००१ ते कमाल १११११ व सरासरी ७५०० रुपये दराने विक्री झाला. इतर राज्यांतील कांदा खराब झाल्याने महाराष्ट्रातील लाल कांद्याची मागणी वाढली असून, मागील सप्ताहाच्या तुलनेत १२०० रुपयांची तेजी होती.