शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

लाल कांद्याचे भाव कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:33 PM

लासलगाव : कांदा पिकावरील वाढविलेले ८५० डॉलरचे प्रतिटन निर्यातमूल्य, लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची वाढती आवक व गुजरातसह इतर राज्यांतून झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात कांदा भावात दररोज वेगाने घसरण होण्यात झाला आहे.

लासलगाव : कांदा पिकावरील वाढविलेले ८५० डॉलरचे प्रतिटन निर्यातमूल्य, लाल कांद्याबरोबरच रांगडा कांद्याची वाढती आवक व गुजरातसह इतर राज्यांतून झालेली कांदा आवक याचा एकूणच परिणाम महाराष्ट्रातील विशेषत: जिल्ह्यात कांदा भावात दररोज वेगाने घसरण होण्यात झाला आहे.लासलगावसह जिल्ह्यात सर्वच बाजार आवारात गुरुवारी कांदा भावात घसरण झाली. जोरदार थंडी आणि पोषक हवामान यामुळे एकरी उत्पादन चांगले येत आहे. परंतु आता प्रामुख्याने निफाड, चांदवड व येवला तालुक्यातून कांदा विक्रीकरिता येत आहे. तसेच पुणे, लोणंद भागातील गावठी कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे.कांदा लिलाव १५०० ते ३८०० रुपये व सरासरी भाव ३५४० रुपये होते. सोमवारी (दि.८) २१८२४ क्विंटल कांदा लिलाव १८०० ते ३५६१ रुपये, तर सरासरी ३१०० भावाने झाले. मंगळवारी (दि. ९) २२७२४ क्विंटल कांदा १५०० ते ३४६३ व सरासरी २९०० रुपये भावाने लिलाव झाले. मंगळवारी १२०० कांदा वाहनातील कांद्याची आवक असून, किमान १८०० ते सर्वाधिक ३२५० रुपये व सरासरी भाव २७०० रुपये होते. मंगळवारी तुलनेत कमाल भावात २०० तर सरासरी भावात दोनशे रुपयांची घसरण झाली.लासलगाव येथील जागतिक कांदा बाजारपेठेत कांदा भाव शंभर रुपयांपेक्षा अधिक कमी होत आहेत. कांद्याची भावाची पातळी कमी झाल्यानंतर कांदा उत्पादकांनी चिंता व्यक्त केली आहे.कांदा विक्र ी कमी भावाने होऊ लागल्यामुळे आर्थिक अडचणीवर मात कशी करावयाची यावरच शेतकरीवर्गाच्या गप्पा बाजार आवारात होताना दिसून आल्या. देशांतर्गत गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. देशात मागणीच्या तुलनेत आवक मोठ्या प्रमाणात येत असून, बाजारभावात घसरण होत आहे. गेल्या दोन महिने कांद्याचे बाजारभाव वाढलेले होते. मात्र यावर्षी पावसाने सरासरीपेक्षा दमदार हजेरी लावल्याने लाल कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक