अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

By Admin | Updated: February 25, 2015 01:10 IST2015-02-25T01:09:57+5:302015-02-25T01:10:21+5:30

अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

Red flush on encroachment by anti-encroachment squad | अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

अतिक्रमणविरोधी पथकाकडून अतिक्रमणावर लाल फुली

नाशिकरोड : मुक्तिधाम समोरील जामा मशीदपासून वास्को चौक व तेथून पुन्हा छाया निवासपर्यंत मनपा अतिक्रमणविरोधी पथकाकडून मंगळवारी रस्त्यावरील अतिक्रमणावर लाल फुली मारण्यात आली. यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
मनपा अतिक्रमणविरोधी पथकाकडून जेलरोड येथे अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, दुकानदार यांनी विरोध केल्यानंतर अतिक्रमणविरोधी मोहीम बंद पडली, तर पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने मोहीम बंद असल्याचे मनपाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत होते. मनपा अतिक्रमणविरोधी पथकाने विभागीय अधिकारी किशोर चव्हाण व इतर विभागांचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात मंगळवारी दुपारी मुक्तिधाम समोरील जामा मशीदपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणावर लाल फुली मारण्यास सुरुवात केली. टपऱ्या, दुकाने, शेड, बोर्ड, ओटे आदिंवर मार्किंग करण्यात येऊ लागल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले.वास्को चौकात देवी मंदिर उद्यानाच्या भिंतीलगत व पुरबाई राजेंद्र कॉम्प्लेक्स जवळील टपरीधारकांनी न्यायालयात दावा दाखल केला असून, स्टे दिलेला आहे, असे सांगत मार्किंग करण्यास विरोध केला. मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांनी तुमची कागदपत्रे कार्यालयात घेऊन या, आम्ही फक्त मार्किंग करत आहोत. कागदपत्रे बघितल्यावर पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले. वास्को चौकापासून जयराम हॉस्पिटलमार्गे छाया निवासपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणांवर लाल फुली मारण्यात आली. मनपाकडून अतिक्रमणावर मार्किंग करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक दुकानदारांनी रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे, रस्त्याच्या बाजूला असलेल्या खांबावर लटकवलेले दुकानांचे फलक काढण्यास सुरुवात केली. या फलकांमुळे त्यामागे लपलेली दुकाने रस्त्यावरून दिसू लागली होती. काही ठिकाणी नाम फलकामुळे असलेली बजबजपुरी हटल्याने मोकळे मोकळे दिसत होते. मार्किंग करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Red flush on encroachment by anti-encroachment squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.