‘तान’ संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:40 IST2019-09-25T00:40:19+5:302019-09-25T00:40:51+5:30
ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

‘तान’ संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
नाशिक : ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मनीष रावल हे होते. नव्या कार्यकारिणीत सचिव म्हणून मनोज वासवानी, सहसचिव अरुण सूर्यवंशी, खजिनदार सिराज शेख, सहखजिनदार प्रशांत आहेर, परेश अमृतकर तर जनसंपर्क अधिकारी म्हणून संदीप मोरे यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्यासाठी संस्थेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल, असे राजेंद्र बकरे यांनी सांगितले. याप्रसंगी मावळते अध्यक्ष दत्ता भालेराव, जयेश तळेगावकर, संजय कदम, अमोल जोशी आदी उपस्थित होते. वैभवी लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले.
तान संस्थेच्या माध्यमातून नाशिकमधील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.