३२ लाखांची वसुली

By Admin | Updated: January 12, 2016 22:12 IST2016-01-12T22:10:44+5:302016-01-12T22:12:32+5:30

मालेगाव : अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम

Recovery of 32 lakhs | ३२ लाखांची वसुली

३२ लाखांची वसुली

मालेगाव : महानगरपालिकेने ५ जानेवारीपासून सुरू केलेल्या अनधिकृत नळजोडणी मोहिमेत आतापर्यंत ३९३ नळधारकांकडून ३२ लाख २७ हजार १४९ रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसेंदिवस यात वाढ होत आहे.
महानगरपालिकेने दहा ते बारा वर्षांनंतर पहिल्यांदाच शहरातील अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम हाती घेतली. हे नळ अधिकृत करण्यासाठी येथील आयुक्त किशोर बोर्डे यांनी दोनवेळा मुदत दिली; मात्र तरीही कोणतीही कारवाई न करता धमकी देण्याचा तसेच नगरसेवकांचा कारवाईतील हस्तक्षेपाचा यापूर्वीचा मनपाचा इतिहास बघता अनधिकृत नळधारकांनी आयुक्तांच्या मुदतीकडे काणाडोळा केला; मात्र आयुक्तांनी
५ जानेवारीपासून प्रत्यक्ष शोधमोहीम हाती घेतली. या मोहिमेत पहिल्या दिवशी कसाबसा नव्वद हजारांचा टप्पा ओलांडल्याने ही मोहीम अपयशी होणार असल्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले; मात्र आयुक्तांनी कडक भूमिका अवलंबल्याने दुसऱ्या दिवशी (दि. ६) मोहिमेत चारही प्रभागांतून ७१ नळधारकांकडून पाच लाख ७२ हजार ६८३ रुपयांची वसुली झाली. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. यावेळी नेहमी धावून येणारे नगरसेवक मोहिमेतून बाहेर राहिल्याने पाठीराखा न मिळाल्याने अनेकांनी नळ अधिकृत करण्यावर भर दिला आहे. या पाच लाखांच्या कमाईने व मोहिमेच्या स्वागताने तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. ७) पाहता पाहता या मोहिमेने १०२ नळधारकांकडून नऊ लाख ५० हजार ६१६ रुपयांची दंड वसुली केली. या मोहिमेत मिळणाऱ्या पैशामुळे चारही पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हुरूप वाढला आहे.
शुक्रवारी ही मोेहीम मनपाच्या एकट्या प्रभाग एकमध्ये राबविण्यात आली. यावेळी ५० नळधारकांकडून ४ लाख ६ हजार ५०० रुपये दंड वसुली केली गेली. यानंतर शनिवार व रविवारच्या सुटीने ही मोहीम बंद ठेवल्याने मोहीम थांबल्याची चर्चा रंगली; मात्र सोमवारी दिवसभर पुन्हा चारही प्रभागात राबविण्यात आली. यादिवशी पाहता पाहता सहजपणे दहा लाखांचा टप्पा पार करण्यात यश आले. (प्रतिनिधी)

Web Title: Recovery of 32 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.