७५ फुटी महाकाय गुढीच्या रांगोळीचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:15 IST2019-04-09T01:15:38+5:302019-04-09T01:15:54+5:30
डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी नाशिकच्या रांगोळी कलावंत रश्मी प्रभाकर विसपुते यांनी साकारली आहे.

७५ फुटी महाकाय गुढीच्या रांगोळीचा विक्रम
सिडको : डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी नाशिकच्या रांगोळी कलावंत रश्मी प्रभाकर विसपुते यांनी साकारली आहे. सोमवारी सायंकाळी उंटवाडीरोडवरील लक्षिका सभागृहात भव्य गुढी रांगोळी कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.
वृंदाताई लव्हाटे यांच्या विशेष सहकार्यातून रश्मी विसपुते यांनी गुढी रांगोळी साकारली आहे. मंगळवार (दि.९) पासून ११ एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत कलाप्रेमी, नागरिकांकरिता महागुढी रांगोळी प्रदर्शन खुले करण्यात आले असून, यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजनही करण्यात आले आहे.
गुढी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्र मास रांगोळी साकारणाऱ्या रश्मी विसपुते, वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमी छेडा, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्यामराव बिरारी यांच्यासमवेत इनरव्हील क्लब आॅफ गेन-नेक्स्टच्या अध्यक्ष दीपाली चांडक, डॉ. मीनल पलोड, सरोज दशपुते आदी उपस्थित होते.
रांगोळी कलावंत रश्मी विसपुते ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी साकारली. या विश्वविक्र मी रांगोळीची नोंद वंडर बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महाकाय गुढी रांगोळी पाहण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.