जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

By Admin | Updated: September 2, 2016 00:22 IST2016-09-02T00:22:09+5:302016-09-02T00:22:19+5:30

जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

Recognition of water works of 35 crores | जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता

 नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध विभागांच्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांपैकी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यातील सात कोटींच्या कामांना येत्या बुधवारी (दि.७) पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे पूर्व व पश्चिम विभागाला प्रत्येकी साडेतीन कोटींची कामे सूचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने लघुपाटबंधारे पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांनी त्यांच्या नऊ तालुक्यांतील सर्व शाखा अभियंता व उपअभियंत्यांना जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सहभागी गावांमधील पाझरतलाव, गावतळे, कोटाबंधारे यांच्या दुरुस्त्या, जलस्त्रोत बळकटीकरण तसेच नवीन कामांबाबतचे प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार हे प्रस्ताव प्राप्त होताच त्यापैकी साडेतीन कोटींच्या प्रस्तावांना बुधवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे.
त्यादृष्टीने अद्यापही लघुपाटबंधारे पूर्व विभागाची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. त्यांना मागील वर्षीच्या जिल्हा परिषद सेसमधील १ कोटी २२ लाखांच्या कामांना अद्याप सर्वसाधारण सभेची मान्यता घेता आलेली नाही. त्यामुळे त्यांचा यावर्षीचा सेसचा निधी खर्च होण्याबाबत सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे पश्चिम विभागांतर्गत ३५ कोटी ३६ लाखांची जलयुक्त शिवार योजनेची एकूण २५८ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यात खासगी उद्योग समूह तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर (सामाजिक दायित्व निधी) निधीतून ४४ लाखांची इगतपुरी तालुक्यात पाच तर दिंडोरी तालुक्यात चार अशी एकूण नऊ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Recognition of water works of 35 crores