जेवणावळीच्या पायघड्यांचा पुनश्च प्रत्यय

By Admin | Updated: March 28, 2017 00:56 IST2017-03-28T00:56:19+5:302017-03-28T00:56:33+5:30

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू आहे.

Reciprocity of dining tricks | जेवणावळीच्या पायघड्यांचा पुनश्च प्रत्यय

जेवणावळीच्या पायघड्यांचा पुनश्च प्रत्यय

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पॅनलकडून जोरदार प्रचार सुरू असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींप्रमाणेच सावानाच्या निवडणुकीतही जेवणावळी सुरू असून, साहित्य क्षेत्रातून याबाबत आश्चर्य व्यक्तकेले जात आहे. काही दिवसांपूर्वी गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात एका पॅनलने जेवणावळी घातल्यानंतर दुसऱ्या अन्य पॅनलनेही त्यांची बरोबरी करत जेवणावळी घालून आम्हीही प्रचारात मागे नाही हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ज्यांनी त्यावेळी ‘डिनर डिप्लोमसी’चा डांगोरा पिटला त्यांच्याकडूनच जेवणावळीचा असा घाट घातल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. गंगापूररोड येथील एका मंगल कार्यालयात झालेल्या जेवणावळीचे फोटो सोशल माध्यमातून फिरल्याने जेवणावळीचा प्रकार समोर आला होता, ही बाब लक्षात ठेवत ‘डिनर डिप्लोमसी’ म्हणवणाऱ्यांनी आपल्या जेवणावळी रात्री उशिरापर्यंत या कानाची त्या कानाला खबर होऊ न देता निर्विघ्न पार पाडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच सावानाच्या निवडणुका रंग घेऊ लागल्याने मत मिळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा कौशल्याचा कोणाला कितपत फायदा होतो हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)
धर्मादाय आयुक्तांकडे वर्ग केलेल्या खटल्याचा युक्तिवाद दोन्ही गटांकडून सोमवारी (दि. २७) पूर्ण करण्यात आला. एक दा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नसल्याने आता बुधवारी (दि. २९) किंवा गुरुवारी (दि. ३०) या प्रकरणाची पुढची दिशा स्पष्ट होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पंधरा दिवसांत या प्रकरणी निकाल देण्याचे आदेश दिलेले असल्याने धर्मादाय आयुक्तयाप्रकरणी काय निकाल देतात याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
‘त्या’ फलकाचा ‘अनोखा प्रवास’
रेडक्रॉस सिग्नल परिसरात एका पॅनलकडून भला मोठा प्रचाराचा फलक उभारण्यात आला आहे. याच फलकावरून प्रचारातील वादाची पहिली ठिणगी पडली होती. फलक लावण्यासाठी या पॅनलकडून मनपातर्फे रितसर परवानगी घेण्यात आली असली तरी रविवारी (दि. २६) फलक लावण्याची मुदत संपुष्टात आली आहे. मुदत संपूनही हा फलक तेथेच असल्याने संबंधित पॅनलनेही हा फलक उतरवून घेण्याचे सौजन्य दाखविले नाही आणि मनपा प्रशासनाकडूनही याबाबत काणाडोळा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Reciprocity of dining tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.