नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 17:57 IST2020-03-09T17:56:46+5:302020-03-09T17:57:18+5:30
सिन्नर : पीक नुकसानभरपाईची रक्कम खात्यावर वर्ग करण्यासाठी होणाºया दिरंगाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत शेतक-यांनी समस्यांचा पाढा वाचला. अनेकदा खातेक्र मांक व कागदपत्रांची पूर्तता करु नही रक्कम खात्यावर जमा होत नाही, तलाठी वेळेवर भेटत नसल्याने कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येतात आदिंसह विविध समस्या शेतक-यांनी मांडल्या. शेतक-यांचे पैसे खात्यावर वर्ग होण्यास येणा-या अडचणी सोडविण्यासाठी गावोगावी महसूल व बॅँक अधिका-यांनी शिबीरे घेऊन शेतक-यांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी यावेळी केल्या

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा !
. अवकाळी पावसामुळे शासनाने शेतक-यांना दिलेली भरपाई अजूनही खात्यावर जमा होत नसल्याने शेतक-यांनी कोकाटे यांच्याकडे तक्र ारी केल्या होत्या. शेतक-यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्र ारी वाढल्यानंतर कोकाटे यांनी महसूल अधिका-यांसह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, बॅँक अधिकारी व शेतकºयांच्या बैठकीचे आयोजन केले होते. तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, गटविकास अधिकारी मीना जगताप, राष्टवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीच्या सुरु वातीस १५गावातील सुमारे २१८० शेतक-यांचे पैसे नावावर वर्ग होण्याचे बाकी असल्याचे सांगण्यात आले. कोकाटे यांनी १५ गावातील शेतक-यांची आकडेवारी वाचल्यानंतर उपस्थित अनेक शेतक-यांनी या यादीत आपल्या गावाचे नाव नसल्याचे सांगितले. या १५ गावाव्यतिरिक्त अनेक गावातील शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर अनेक शेतक-यांनी आपल्या समस्या मांडल्या.