शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

बंडखोरीमुळे मतविभागणीचा बसणार फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:48 IST

नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनांदगाव: निवडणूक राग-रंगहतबल भूमिपुत्र : अपक्ष उमेदवाराला मिळणाऱ्या मतांवरच ठरणार विजयाचे गणित

संजीव धामणेनांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात होत आहे; मात्र पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती असलेले भाजपचे रत्नाकर पवार यांनी बंडखोरी केल्याने चुरस निर्माण झाली आहे.नांदगाव मतदारसंघात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने शिकून तिकडेच स्थलांतरित होण्याकडे तरुणांचा कल आहे. औद्योगिक रोजगाराच्या संधी नगण्यच आहेत. शेतीसिंचनाचा एखादा अपवाद वगळता नाव घेण्यासारखे प्रकल्प नाहीत. यंदाच्या मान्सूनमध्ये सगळीकडे महापूर आला असताना येथील नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत. शेती हाच रोजंदारी मिळविण्याचा मार्ग असला तरी पाण्याचा स्रोत नसल्याने इतर तालुक्यांपेक्षा येथील शेती कष्टप्रद व कमी उत्पन्नाची आहे. नार-पार प्रकल्पाकडे डोळे लावून बसलेले मतदार, मनमाड तालुकानिर्मिती, उद्योग- रोजगाराची वानवा आदी प्रश्न येथे भेडसावत आहेत.पाण्याचा नसला तरी समस्यांचा पूर या मतदारसंघात आहे. निवडणुका जवळ आल्या की नांदगाव मतदारसंघ विक्रीला आहे, असा सूर भूमिपुत्रांकडून आळवला जातो; मात्र निवडणुकीत त्यांचे ध्रुवीकरण होऊन राजकारण फिरते. विद्यमान आमदार पंकज भुजबळ हे गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मतदारांसमोर कौल मागत आहेत. तर शिवसेनेकडून सुहास कांदे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. मतदारसंघात शिवसेनेचे गावोगावी जाळे निर्माण झाले असले तरी, राष्टÑवादीनेही बºयापैकी हातपाय पसरले आहे. निवडणुकीत भुजबळ-कांदे यांच्यात प्रमुख लढत होत असली तरी, भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांनीही आव्हान उभे केल्याने मतविभागणीचा धोका वाढला आहे. ही मतविभागणी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडते हे येता काळच सांगेल. तिरंगी लढतीमुळे निवडणूक मात्र चुरशीची बनली आहे.मतदारसंघातीलकळीचे मुद्देमनमाड व नांदगावचा पाणीप्रश्न, नार-पार प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश व्हावा.४व्यावसायिक शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत. औद्योगिक वसाहत, शेतीवर आधारित उद्योगनिर्मिती.४तालुक्यात रेल्वेच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती.निकराची लढत होण्याची चिन्हेमागील निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. सगळे पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजप व सेनेतील मतविभागणीचा फायदा विजयी उमेदवाराला झाला होता. यावेळी युती असूनही भाजपच्या रत्नाकर पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे मतांची विभागणी अटळ आहे. भाजपचे माजी आमदार संजय पवार राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ तिसऱ्यांदा नशीब आजमावत असले तरी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांचे पुन्हा एकदा कडवे आव्हान असल्याने लढत निकराची होणार आहे.बदललेली समीकरणेमनमाडच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर उमेदवार निवडून आल्याचा इतिहास आहे. गेल्यावेळी मनमाडचा पाणीप्रश्न ऐरणीवर होता. आज ८ ते १० दिवसांनी येणाºया पाण्यामुळे तो शिथिल झाला असला तरी करंजवणचे पाणी, हा मुद्दा पुढे आला आहे.प्रशासकीयदृष्ट्या वेगळा पडलेल्या व लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे दु:खी असलेल्या मालेगाव जिल्हा परिषदेच्या अडीच गटातील मतदारांची ताकद यावेळी पक्ष की व्यक्ती यापैकी कुणाकडे झुकणार, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल.मागील निवडणुकीत सेना-भाजप स्वतंत्र लढले त्यावेळी दोन्ही उमेदवारांनी प्रत्येकी ५० हजाराच्या वर मते घेतली होती. यंदा भाजप उमेदवार राष्टÑवादीच्या गोटात दाखल झाल्यामुळे राष्टÑवादीच्या उमेदवाराला त्यांचे अधिकचे बळ वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगावPankaj Bhujbalपंकज भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना