शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात बंडखोरी, दिंडोरीत नाराजीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:29 IST

लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे

नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे, तर दिंडोरी मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापल्याने तेदेखील नाराज आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना आणि भाजपा युती असली तरी विधानसभा निवडणुकीत उभय पक्षांत बिनसले त्यामुळे यंंदा युती होण्याची शक्यता नसल्याने दोन्ही पक्षांतून अनेक इच्छुकांनी तयारी आरंभली होती. (पान ५ वर)परंतु युती झाल्यानंतर नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भाजपातील इच्छुकांची अडचण झाली. ही जागा शिवसेनेकडे असल्याने या पक्षाने खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तयारीत पुढे गेलेल्या अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी आता मागे न फिरता भाजपाने संधी दिल्यास मैत्रिपूर्ण अथवा अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान, दिंडोरी मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असून, राष्टÑवादीकडून ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या डॉ.भारती पवार यांना संधी दिली आहे. गेल्यावेळी चव्हाण यांनी डॉ. भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता.

 

टॅग्स :nashik-pcनाशिकBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूकdindori-pcदिंडोरी