नाशिकमध्ये बस फे-या कमी करण्यामागे आर्थिक तोट्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:21 IST2018-01-08T13:18:12+5:302018-01-08T13:21:05+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे.

नाशिकमध्ये बस फे-या कमी करण्यामागे आर्थिक तोट्याचे कारण
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : शहरातील प्रवाशांची वाहतूक करणा-या एस.टी. महामंडळाला दरमहा दोन कोटी रूपये तोटा सहन करावा लागत असल्याने शहरांतर्गंत प्रवाशी फे-या कमी केल्याने नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत असतांना एस.टी. महामंडळाने मात्र अशा प्रकारच्या फे-या कमी केल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होत नसल्याचा पवित्रा घेतला आहे. उलट ज्या फे-यांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो त्या फे-या एकत्रिकरण व सुसूत्रीकरण करून चालविण्यात येत असल्याचा दावा केला आहे.
नाशिकचे प्रवाशी उदय कुलकर्णी यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाला पत्र पाठवून नाशिक शहरातील प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष वेधले असता, न्यायालयाने एस. टी. महामंडळाच्या महा व्यवस्थापकांना तसेच नाशिक विभागीय नियंत्रकांना नोटीस पाठवून खुलासा मागविला होता. त्यावर एस.टी.महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतुक) यांनी न्यायालयात खुलासा करताना सारवा सारव केली आहे. त्यात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागामार्फत नािशक शहराकरिता शहर सेवा पुरविण्यात येते. शहर सेवा चालविल्यामुळे दरमहा दोन कोटी रूपये इतका तोटा होत आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सद्यस्थितीत तोटा सहन करूनही सर्व शाळा, लोकप्रतिनिधी व नोकरदार वर्गाने सुचना केल्याप्रमाणे शहर बस सेवेच्या फेºयांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्या चालनात असलेल्या नियतांमध्ये समाविष्ट करण्यात येतात, परिणामी प्रवाशांची अथवा विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय झालेली नाही. प्रतिवर्षी उन्हाळी सुटीच्या कालावधीत शालेय नियते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येतात व शाळा सुरू होण्याच्या वेळेस स्थगित केलेली नियते व फे-या या पुनश्च सुरू करण्यात येतात. तसेच नाशिक शहरातील शहर बस वाहतुकीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून, ज्या फे-यांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो त्या फेरत्या एकत्रिकरण व सुसूत्रीकरण करून तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सुचनेनुसार चालविल्या जात आहेत.