कर्जमाफीचा लाभ न झाल्याने दह्याणेच्या शेतकऱ्याची आत्महत्य
By Admin | Updated: July 5, 2017 01:20 IST2017-07-05T01:20:06+5:302017-07-05T01:20:17+5:30
वडनेरभैरव : दह्याणे येथील अशोक दिनकर भवर या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

कर्जमाफीचा लाभ न झाल्याने दह्याणेच्या शेतकऱ्याची आत्महत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील अशोक दिनकर भवर (३९) या शेतकऱ्याने घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
भवर यांचे एकत्र कुटुंब असून, ते कुटुंबप्रमुख होते. अशोक यांच्या नावावर तीन लाख ३० हजार रुपयांचे, भाऊ भरत याच्यावर चार लाख २० हजार रुपयांचे, तर आई ताराबाई यांच्यावर ३ लाख ५७ हजार रुपयांचे असे एकूण ११ लाख ४२
हजार रुपये सोसायटीचे कर्ज आहे. शासनाच्या कर्जमाफीचा भवर यांना लाभ झाला नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. दरम्यान चांदवडचे तहसीलदार शरद मंडलिक,सहायक पोलीस निरिक्षक नितीन पाटील,मंडल अधिकारी विजय भंडारे यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,भाऊ असा परिवार आहे.