शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पत्नीचा अधिक पगार ठरतोय ‘गृहकलहाचे’ कारण

By संदीप भालेराव | Published: March 17, 2019 1:02 AM

सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.

नाशिक : सुख-दु:खात एकमेकांशी आयुष्यभराची साथ करण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह केलेल्या अलीकडील पती-पत्नीचा संसार अल्पायुषी ठरत आहे. शिकलेल्या बायकोला असलेला जास्त पगार आणि कमी शिकलेल्या नवरोबाला होणारा कमी पगार किंवा बेरोजगारी यातून निर्माण झालेल्या ‘इगो’मुळे नवरा-बायकोमधील गृहकलह वाढत असल्याचा निष्कर्ष नाशिकच्या कौटुंबिक सल्ला केंद्राने काढला आहे.गृहकलह प्रत्येक घरात होत असतोच. आताचा काळही त्याला अपवाद नाही. संसारात काही कुरबुरी असल्या तरी फार मोठे काही घडल्याशिवाय भांडणे चार भिंंतीच्या बाहेर येत नव्हती. आधुनिक काळात तर भांडणाची अचंबित करणारी कारणेही समोर आली आहेत. संसार करीत असताना समज-गैरसमजावरून होणारे वाद इथपर्यंत समजण्यासारखे आहे. परंतु प्रेमात पडल्यानंतर अल्पावधीच लग्नगाठ बांधणाऱ्या कॉलेज तरुण-तरुणींमध्ये आपसातील ‘इगो’ संसार मोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे कौटुंबिक सल्ला केंद्राकडे येणाऱ्या तक्रारीवरून दिसून आले आहे.महाविद्यालयात शिकत असताना मुले-मुली प्रेमात पडतात आणि काहीकाळानंतर लग्नगाठही बांधतात. शिक्षणात मुली आघाडीवर असल्याने शक्यतो मुलगी अधिक शिकलेली तर मुलाचे शिक्षण त्यामानाने कमी असते. प्रेमविवाह असल्याने शक्यतो विभक्त आणि प्रकरणात एकत्र कुटुंबात त्यांचा संसार सुरू होतो. अशावेळी दोघेही नोकरी पत्करतात. शिक्षनानुसार पत्नीला असलेला जास्त पगार आणि पतीला कमी पगार हा कालांतराने गृहकलहाला कारणीभूत ठरतो आणि त्यातून संसारात वाद सुरू होतात.नाशिक शहरात अशा प्रकारच्या तक्रारींचे प्रमाणे २५ ते ३० टक्के असल्याचा दावा नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समिती संचलित कौटुंबिक सल्ला केंद्राने केला आहे. तक्रारी दोन्ही पक्षाकडून केल्या जातात. पती अपेक्षित कमावत नसल्याची पत्नीची तक्रार असते तर पत्नी पगाराच्या जोरावर घरात वर्चस्व निर्माण करीत असल्याची पतीची तक्रार असते. अशा प्रकारच्या महिन्यात दहा तरी तक्रारी दाखल होत आहेत.अलीकडच्या काळात प्रेम करताना कोणतीही बाब त्यांचा व्यर्ज नसते. लग्नानंतर मात्र ‘आटे डाल का भाव’ त्यांना माहिती होतो. अशा केसेस अत्यंत नाजूकपणे हाताळण्याची आवश्यकता असल्याने अशा प्रकारच्या दरमहा किमान दहा तरी कसेस सोडवाव्या लागतात. त्यांचे समुपदेशन करावे लागते. तडजोडीनंतर संबंधित कुटुंबाला अचानक भेट देऊन कुटुंबातील खुशाली पाहण्याची जबाबरी महिला हक्क बजावत असून ‘इगो’ असलेल्या महिलेला आणि पुरुषालाही समजावून सांगणे कठीण होऊन बसते. त्यामुळे हा तिढा अत्यंत कौशल्यतेने सोडवावा लागतो.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय