पक्षासाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:11 IST2021-06-29T04:11:39+5:302021-06-29T04:11:39+5:30

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, नाशिकरोड परिसराने शिवसेनेला सदैव साथ दिली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे ...

Ready to wave for the party | पक्षासाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार

पक्षासाठी जीव ओवाळून टाकण्यास तयार

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले, नाशिकरोड परिसराने शिवसेनेला सदैव साथ दिली आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वप्न साकार करा. निवडणूक काळात तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे बडगुजर यांनी स्पष्ट केले.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते अंबादास ताजनपुरे, भास्करराव शिरसाट, सोमनाथ सहाने, शिवाजी भोर, चंद्रकांत विसपुते, दशरथ म्हस्के, सोमनाथ मोरे, अशोक जाधव, शंकरराव खेलुकर, हेमंत कुलकर्णी, गोपी मालपाणी, विश्राम बाबा बच्छाव आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा प्रमुख नितीन चिडे, उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख, सभापती जयश्री खर्जुल, नगरसेवक सूर्यकांत लवटे, प्रशांत दिवे, मंगल आढाव, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, जयंत गाडेकर, सुधाकर जाधव, मसूद जिलानी, शिवा ताकाटे, श्याम खोले, सुभाष घिया, उत्तम कोठुळे, दिनकर आढाव, रतन बोराडे, बाबुराव आढाव, गंगाधर उगले, विक्रम खरोटे, प्रशांत पेंढारकर, वैभव देशमाने, अविनाश गायकवाड, स्वप्नील सहाने, सागर भोजने, रोशन आढाव, अमोल धामणे, धीरज पन्हाळे आदी उपस्थित होते.

===Photopath===

280621\28nsk_25_28062021_13.jpg

===Caption===

जेष्ठ शिवसैनिकांचा मेळावा

Web Title: Ready to wave for the party