कोकणगाव शाळेत विद्यार्थिंनींसाठी ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 13:28 IST2020-01-02T13:28:02+5:302020-01-02T13:28:15+5:30
कोकणगाव : महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ या उपक्रमांतर्गत देण्यात आले.

कोकणगाव शाळेत विद्यार्थिंनींसाठी ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ उपक्रम
कोकणगाव : महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्त्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ या उपक्रमांतर्गत देण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कोकणगाव यांच्या सहकार्याने प्रत्येक शनिवारी कराटे शिक्षक महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ हा उपक्र म राबविण्यात आला. विद्यार्थिनींना कराटे या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्र माचे उद् घाटन सरपंच आंबदास गांगुर्डे यांच्याहस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपसरपंच भारत मोरे, शालेय समिती अध्यक्ष यादव मोरे, उपाध्यक्ष वामनराव मोरे, जगन्नाथ मोरे, तुकाराम पवार तसेच सदस्य , मुख्याध्यापक सुरेश चौधरी , नरेंद्र जाधव, बबिता गांगुर्डे, अनिल माळी, राजेंद्र पवार, संजय शिंदे, रु पाली महाले, शोभा आहिरे, शालिनी जाधव, अलका शिंदे, अनिता गवळी, रेखा पळसे, शीतल बावणे, रोशन महाले, शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.