ठाणगावला ग्रामसभेत शेतकरी कृषी सन्मान यादीचे वाचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 16:54 IST2019-02-13T16:53:39+5:302019-02-13T16:54:50+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे शेतकरी सन्मान कृषी योजनेच्या यादीचे चावडी वाचन करण्यात आले.

ठाणगावला ग्रामसभेत शेतकरी कृषी सन्मान यादीचे वाचन
येथील मारूती मंदिरात तलाठी वाय. आर. गावित, कृषी साहाय्यक अनिल दातीर, ग्रामसेवक डी. एस. भोसले, दिलीप शिंदे, ए. टी. शिंदे आदीच्या उपस्थितीत चावडी वाचन करण्यात आले. कृषी साहाय्यक दातीर यांनी दोन हेक्टरच्या आतील पात्र शेतकऱ्यांच्या कुंटुबाची यादी वाचन करण्यात आले. ठाणगाव परिसरात १६३४ शेतकरी खातेदार असून त्यापैकी ३०० खातेदार हे या सन्मान कृषी योजनेसाठी अपात्र ठरले आहे. या सन्मान कृषी योजनेत प्रत्येक शेतकरी खातेदाराच्या बँक खात्यात सहा हजार रूपये जमा होणार आहे. हे सहा हजार रूपये तीन टप्पात शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असून त्यासाठी महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने परिसरातील शेतक-यांची बँक खाते व आधारकार्ड गोळा करण्याचे काम सुरु आहे.