शवविच्छेदन अहवालामुळे खुनास फुटली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:20 IST2017-11-06T00:20:26+5:302017-11-06T00:20:26+5:30

इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरात दुपारच्या जेवणानंतर झोपलेल्या सासूला उठविण्यासाठी गेलेल्या सुनेला सासूने प्रतिसाद न दिल्याने उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) घडली होती़ या प्रकरणी पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र शवविच्छेदन अहवालात सासू मीनाबाई उत्तम निकम (४६) यांचा नैसर्गिक नव्हे तर गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read through the autopsy report to crack the scandal | शवविच्छेदन अहवालामुळे खुनास फुटली वाचा

शवविच्छेदन अहवालामुळे खुनास फुटली वाचा

इंदिरानगर : पाथर्डी फाटा परिसरात दुपारच्या जेवणानंतर झोपलेल्या सासूला उठविण्यासाठी गेलेल्या सुनेला सासूने प्रतिसाद न दिल्याने उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केल्याची घटना शुक्रवारी (दि़३) घडली होती़ या प्रकरणी पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली; मात्र शवविच्छेदन अहवालात सासू मीनाबाई उत्तम निकम (४६) यांचा नैसर्गिक नव्हे तर गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाथर्डी फाटा परिसरातील अनुग्रह रेसिडेन्सी इमारतीतील रूम नंबर सहामध्ये मीनाबाई उत्तम निकम (४६) या मुलगा व सुनेसह राहतात़ शुक्रवारी दुपारी जेवण करून झोपलेल्या मीनाबाई यांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास सून पल्लवी ही उठविण्यासाठी गेली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही़

Web Title: Read through the autopsy report to crack the scandal