‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनसाध्वी प्र्र्रीतिसुधाजी यांचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:45 PM2020-08-01T23:45:40+5:302020-08-02T01:25:37+5:30

नाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.

Re-publication of the book 'Chaitanya Rasacha Pravaho' Celebrates the Birthday of Sadhvi Praritisudhaji | ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनसाध्वी प्र्र्रीतिसुधाजी यांचा वाढदिवस साजरा

लॅमरोड येथे श्रीमद आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना प.पू. मधुस्मिताजी म.सा., पू.पू. भावप्रीतिजी म.सा. समवेत सुरेश चोरडिया, राजू लुणावत, शांतीलाल अलिझाड, नेमिचंद बेदमुथा, सुभाष छाजेड, संदीप ललवाणी, पपिता ललवाणी, जेसिका ललवाणी आदी.

Next
ठळक मुद्दे झूम अ‍ॅपद्वारे स्वरसम्राज्ञी प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.
प.पू. वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सकाळी १० ते ११ पर्यंत लॅमरोड येथील वीरायतन सोसायटी, मातृतीर्थ बंगल्यात आॅनलाइन झूम अ‍ॅपद्वारे स्वरसम्राज्ञी प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभेच्छा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्रीमद् आचार्य कुंदुकुंद यांच्या व्याख्यान व प्रवचनावरील ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या सोलापूर येथील प्राचार्य सुमेरचंद्र जैनलिखित पुस्तकाचे पुनर्प्रकाशन पुण्यामध्ये साध्वी प्रीतिसुधाजी म.सा., डॉ. गंगवाल यांच्या हस्ते, तर लॅमरोड येथे प.पू. मधुस्मिताजी म.सा., व प. पू. भावप्रीतीजी म.सा. यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगावचे दलुभाऊ जैन, कळवणचे बेबीलाल संचेती, नाशिकचे मोहनलाल चोपडा, प.पू. प्रवीणऋषीजी म.सा., सोहनलाल भंडारी, जयप्रकाश लुणावत, पोपटशेठ कोठारी, सतीश सुराणा, डॉ. मंगल दुग्गड, पंकज सामसुखा, शकुंतला चोरडिया, उज्ज्वला पोटे आदींनी प्रीतिसुधाजी म.सा. यांच्याशी आॅनलाइन संवाद साधला. संगीता बाफना यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजीव लुणावत, सुरेश चोरडिया, शांतिलाल अलिझाड, नेमिचंद बेदमुथा आदी उपस्थित होते.वाणीभूषण प.पू. साध्वी प्रीतिसुधाजी म.सा. यांना प.पू. मधुस्मिताजी म.सा. यांनी भजन गात शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील आयुष्यात आत्मसाक्षात्कार घडण्यासाठी व निरामय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Re-publication of the book 'Chaitanya Rasacha Pravaho' Celebrates the Birthday of Sadhvi Praritisudhaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.