उत्तरपत्रिका तपासणीची पुन्हा मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:48 IST2019-06-20T00:47:45+5:302019-06-20T00:48:07+5:30

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील वाणिज्य शाखा तृतीय वर्षाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, ...

 Re-examination of the post of papers | उत्तरपत्रिका तपासणीची पुन्हा मागणी

उत्तरपत्रिका तपासणीची पुन्हा मागणी

नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील वाणिज्य शाखा तृतीय वर्षाच्या बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून, पुन्हा उत्तरपत्रिकेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. प्राचार्य धनेश कलाल यांना युवा सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बिझनेस रेग्युलिटी फ्रेमवर्क या विषयाची उत्तरपत्रिका पुन्हा तपासून नव्याने निकाल जाहीर करण्यात यावा. निवेदनावर अजिंक्य गायधनी, गौरव घाडगे, विशाल पाटील, प्रतीक महाले, सुशांत भडांगे, महेश देवरे, अमित इंगळे, प्रकाश कोटवार, शुभम छाजेड, कीर्ती खरे, महाजन आदींच्या सह्या आहेत.

Web Title:  Re-examination of the post of papers