शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रविंद्र बागूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 16:21 IST2020-01-04T16:21:24+5:302020-01-04T16:21:51+5:30

रविवारी विशेष अधिवेशनात पदभार स्वीकारणार

Ravindra Bagul as National President of Shimpi Community | शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रविंद्र बागूल

शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रविंद्र बागूल

ठळक मुद्देदेवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानापासून नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन

सटाणा : अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सटाणा येथील प्रतिष्ठीत व्यापारी रविंद्र गोविंदशेठ बागूल यांची निवड समाजाच्या राष्ट्रीय बैठकीत एकमताने करण्यात आली आहे. रविवारी (दि.५) होणाऱ्या समाजाच्या विशेष अधिवेशनात बागूल पदभार स्वीकारणार आहेत.
शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा रविवारी (दि.५) दुपारी ११ वाजता होत आहे. अध्यक्षस्थान मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष सुनिल निकुंभ भूषिवणार आहेत. संमेलनात नविनर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल पदभार स्विकारणार असून सकाळी ९ वाजता देवमामलेदार यशवंतराव महाराज देवस्थानापासून नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी नामविश्व विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार असून संमेलनास राज्यातील शिंपीसमाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रोहित तरटे यांनी दिली.

Web Title: Ravindra Bagul as National President of Shimpi Community