रौनक जैन देशात तेविसावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:22+5:302021-02-05T05:37:22+5:30
नाशिक : सनदी लेखापल अर्थात चार्टड अकाउंट अभ्यासक्रमाच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आली ...

रौनक जैन देशात तेविसावा
नाशिक : सनदी लेखापल अर्थात चार्टड अकाउंट अभ्यासक्रमाच्या नवीन आणि जुन्या अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षांचा निकाल सोमवारी (दि.१) जाहीर झाला असून नाशिकचा विद्यार्थी रौनक जैन याने अव्वल स्थानक पटकावत देशातील क्रमवारीतही तेविसावे स्थान पटकावले आहे.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकच. या विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. या परीक्षेत नाशिकच्या रौनक जैन याने ८०० पैकी ५४१ गुणांसह नवीन अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील दोन्ही ग्रुप पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून संपूर्ण देशात तेविसाव्या क्रमांकाचे लक्षवेधी यश संपादन केले आहे. त्याचप्रमाणे सुशांत पवार ४९३, तेजस लोढा ४२७, कुलभूषण पाटील ४१९ गुणांसह प्रथम प्रयत्नातच दोन्ही ग्रुप उत्तीर्ण केले असून वर्धन जाजू, तौसिफ शेख, हर्षाली मराठे, प्रतीक्षा दोषी, स्वप्निल वाघ, आदित्य जाजू, संयमी बागमार, प्रणित गदीये, सेजल सुराणा, प्रतीक जेजूरकर, प्रणीत जैन, हर्षल जैन, प्रियंका ठक्कर या विद्यार्थ्यांनीही सीएची परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केले आहे.