भाजपच्या महिला आघाडी बागलाण तालुकाध्यक्षपदी रत्नमाला सूर्यवंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:08 IST2020-02-01T19:07:37+5:302020-02-01T19:08:09+5:30
सटाणा : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी येथील बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या बागलाण महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी रत्नमाला सूर्यवंशी यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना डॉ. शेषराव पाटील, संजय देवरे, राहुल सोनवणे, मीना मोरे, ज्योती आहिरे, साहेबराव सोनवणे, संजय सोनवणे आदी.
सटाणा : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी येथील बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती अपेक्षित मानली जात होती. अखेर खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सुरेश निकम आदींसह पक्षश्रेष्ठींनीही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. शेषराव पाटील, बागलाण तालुकाध्यक्ष संजय देवरे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, जि. प. सदस्य मीना मोरे, प. स. सदस्य ज्योती आहिरे, ज्येष्ठ नेते साहेबराव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, निरपुरचे सरपंच शरद सूर्यवंशी, मोरेनगरचे माजी सरपंच सुरेश मोरे, दिलीप आहिरे, जे. डी. पवार, जीवन सोनवणे, प्रकाश कुमावत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी उपस्थित होते.