रेशन दुकानदार १ जूनपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 23:58 IST2020-05-27T22:27:13+5:302020-05-27T23:58:12+5:30
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.

रेशन दुकानदार १ जूनपासून संपावर
नाशिक : रेशन दुकानदारांना विम्याचे संरक्षण मिळावे त्याचबरोबर अन्य विविध मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ मेपासून रेशन दुकानदार चलन भरणार नाही तसेच १ जूनपासून धान्य वितरण करणार नसल्याचा निर्णय दुकानदार संघटनेने घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे ५ दुकानदारांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे तसेच एप्रिल, मे, जून महिन्यासाठी मोफत दिलेले तांदूळ व डाळ विक्रीचे कमिशन त्वरित देण्यात यावे, सर्व दुकानदार व मदतनीस यांना कोरोना संरक्षण किट द्यावे, जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही तोपर्यंत कार्डधारकांचे ई-पॉश मशीनवर अंगठा न घेता त्याच्या नॉमिनीचा अंगठा घेण्याचा आदेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुकानदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे, शेख निसार, जितू पाटील, भगवान आढाव, किरण काथे, रवींद्र पगारे, एकबाल खान,पद्माकर पाटील, प्रवीण शेवाळे आदींनी केले आहे.
--------------------------------
४तामिळनाडूमध्ये रेशन दुकानदारांना दिल्या जाणाºया मानधनाप्रमाणे राज्यातील दुकानदारांना मानधन देण्यात यावे आदी मागण्या दुकानदार संघटनेने केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास ३१ मेपासून एकही दुकानदार धान्य उचलण्यासाठी चलन भरणार नाही, त्याचबरोबर १ जूनपासून धान्य वितरित करणार नसल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.