औंदाणे येथे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 00:32 IST2020-09-13T22:50:57+5:302020-09-14T00:32:25+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील गावाजवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेमुळे दोन तरु णांचा मृत्यू झाल्याने बाग लाण तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रविवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले.

तरसाळी फाट्याजवळीलमहामार्गावर रस्ता दुरु स्तीबाबत रास्ता रोको आंदोलन करताना तुषार निकम, प्रभाकर रौंदळ, कपिल सोनवणे, रु पेश सोनवणे, किरण मोरे, बापू रौंदळ, शांताराम भामरे, बापू रौंदळ, रुपेश सोनवणे आदी.
औंदाणे : बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील गावाजवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डयांच्या दुरवस्थेमुळे दोन तरु णांचा मृत्यू झाल्याने बाग लाण तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी रविवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले.
या महामार्गावर मोठमोठी खड्डे पडली आहेत. यातून मार्गक्रमण करताना झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला असून, अनेक प्रवाशांना जायबंदी व्हावे लागले आहे. महामार्गावरील दररोज हजारो वाहने गुजरातकडून ये-जा करतात. हा मार्ग गुजरातला जाण्यासाठी जवळचा असून नाशिकहून सुरत येथेही जाण्यासाठी जवळचा आहे. अवजड वाहने याच महामार्गावरून जातात. मात्र, झालेल्या पावसामुळे या महामार्गावरील खड्डे वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे प्रहार संघटनेचे तालुकाध्क्ष तुषार निकम, बाजार समितीचे संचालक प्रभाकर रौंदळ कपील सोनवणे, रु पेश सोनवणे, किरण मोरे, केतन निकम, शांताराम भामरे, बापू रौंदळ अदींच्या नेतृत्वाखाली अचानक रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.