रासबिहारी म्युझिक अवॉर्ड स्पर्धा

By Admin | Updated: March 8, 2016 00:16 IST2016-03-07T23:42:03+5:302016-03-08T00:16:14+5:30

शहरातील विविध शाळांनी घेतला सहभाग

Rasbihari Music Award Competition | रासबिहारी म्युझिक अवॉर्ड स्पर्धा

रासबिहारी म्युझिक अवॉर्ड स्पर्धा

 नाशिक : रासबिहारी इंटरस्कूल म्युझिक अवॉर्ड संगीत स्पर्धेचे रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचा गायक पं. प्रभाकर दसककर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सोलो सिंसिंग, ज्युनिअर सिंसिंग, सिनिअर सिंसिंग या तीन प्रकारात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील गाण्यांचे सादरीकरण केले, तर वाद्यवादन स्पर्धेत तबला, ड्रम सेट, ढोलकी, पखवाज, हार्माेनिअम, गिटार, बासरीवादन केले. इंग्रजी सिनिअर समूह गायन स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कूल (प्रथम) तर अशोका युनिव्हर्सल स्कूल चांदसी आणि होरायझन अकॅडमीने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. इंग्रजी ज्युनिअर समूह गायन प्रकारात विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल (प्रथम), अशोका युनिव्हर्सल स्कूल चांदसी (द्वितीय), इस्पॅलिअर एक्सपेरिमेंटल स्कूल (तृतीय), मराठी - हिंदी समूह गायन प्रकारात विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल (प्रथम), अशोका युनिव्हर्सल स्कूल वडाळा (द्वितीय), एस.एस.के. पब्लिक स्कूल (तृतीय), सोलो सिंसिंग प्रकारात अशोका युनिव्हर्सल स्कूलची तन्मई घाटे (प्रथम), नाशिक केंब्रिज विद्यालयातील अथर्व वैरागकर (द्वितीय), न्यू इरा स्कूलची देविका सराफ (तृतीय), ज्युनिअर कथक नृत्य प्रकारात जिल्हा परिषद शाळेतील मृणाली जाधव, सिनिअर कथक नृत्य प्रकारात विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमधील चिन्मयी गोरे तर तालवाद्य वादनामध्ये अशोका युनिव्हर्सल स्कूल तनुष कपोते (तबला) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. (प्रतिनिधी)

Web Title: Rasbihari Music Award Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.