शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नात्याने पुतण्या लागणाऱ्या युवकाचा काकूवर बलात्कार; युवकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 01:14 IST

लग्नाच्या पूर्वतयारीसाठी बाहेरगावी गेलेल्या विवाहित महिलेवर गावातीलच नात्याने पुतण्या लागणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना मांजरगाव परिसरात घडली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमांजरगावची घटना : पोलिसांकडून गुन्हा दाखल

घोटी : लग्नाच्या पूर्वतयारीसाठी बाहेरगावी गेलेल्या विवाहित महिलेवर गावातीलच नात्याने पुतण्या लागणाऱ्या युवकाने बलात्कार केल्याची घटना मांजरगाव परिसरात घडली आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, शेणवड बु. (ता. इगतपुरी) येथील कुटुंब आपल्या नातेवाईकाच्या लग्नाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (दि.२४) सायंकाळी मांजरगाव येथे गेले होते. अशातच गावातील नात्याने पुतण्या लागणाऱ्या संशयित किरण वसंत दिवटे (वय २२, रा. शेणवड बु.) याने नात्याने लागणाऱ्या काकूस नाना दारू पिऊन तिकडे अंधारात पडला आहे, असे सांगून तिला नाल्याकडे घेऊन गेला. यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याने विवाहितेला नाल्यात ओढाताण करत नेले व जिवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, आपली कशी तरी सुटका करून घेत ही महिला धावत पळत आपल्या नातेवाईकांच्या घरी पोहोचली आणि घडलेला प्रकार कथन केला. यावर तातडीने संबंधितांनी पोलीस ठाण्यात धाव घेत या युवकावर गुन्हा दाखल केला. घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कवडे, हवालदार शीतल गायकवाड, अमोल केदारे यांनी तातडीने संशयित आरोपीस ताब्यात घेत अटक केली.

टॅग्स :NashikनाशिकMolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारी