एकतानगर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:47+5:302021-05-08T04:14:47+5:30
नाशिक रोड : जेल रोडच्या मोरे मळ्यातील एकतानगर येथे गेल्या पाच महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मोबाइलवर व व्हाॅट्सॲपवर ...

एकतानगर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नाशिक रोड : जेल रोडच्या मोरे मळ्यातील एकतानगर येथे गेल्या पाच महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मोबाइलवर व व्हाॅट्सॲपवर मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी संशयित युवकाविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेल रोडच्या मोरे मळ्यात डिसेंबर २०२० पासून ५ मे २०२१ पर्यंत संशयित अस्लम उर्फ बबलू इकाबल खाटीक (१९, रा. दहिवेल, साक्री, धुळे) हा बहिणीच्या दिराच्या लग्नासाठी आला होता. बहिणीच्या घरासमोर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा गेल्या पाच महिन्यांपासून पाठलाग करून मोबाइल व व्हॉट्सॲपवर मेसेज टाकून तू माझ्याशी रोज बोलली नाही, तर तुझ्या लग्नाच्या अगोदर हात धरून काढलेला फोटो फेसबुकवर टाकून व्हायरल करेन, अशी धमकी देत होता. तसेच तिच्या मोबाइलवर वारंवार मेसेज पाठवून, व्हाइस काॅल करून बोलण्यास भाग पाडून लैंगिक छळ केला. या प्रकरणी संशयित अस्लमविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.