शहरात रंगली प्रचार कोजागरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 00:40 IST2019-10-14T00:40:33+5:302019-10-14T00:40:51+5:30
विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच रविवारी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी दुग्धपान उपक्रमाचे आयोजन केले होते.

शहरात रंगली प्रचार कोजागरी
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच रविवारी कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी दुग्धपान उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उमेदवारांनी उपस्थित मतदारांना येत्या २१ तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले. याशिवाय त्यांनी आजवर केलेल्या कामांचीही माहिती ठेवण्यात आली. शहरात ठिकठिकाणी दुग्धपानाचे आयोजन करण्यात आल्याने रविवारी दुधाचे दरही चढे होते. यानिमित्त दुग्ध व्यावसायिकांची चांदी झाली.