बाजार समितीच्या रंगरंगोटीने आश्चर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:40 IST2017-07-19T00:38:49+5:302017-07-19T00:40:21+5:30
बाजार समितीच्या रंगरंगोटीने आश्चर्य

बाजार समितीच्या रंगरंगोटीने आश्चर्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड गुरुवारी (दि. २०) होणार असून, नवीन सभापतींच्या कक्षाला सुरू करण्यात आलेल्या रंगरंगोटीने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही संचालकांच्या मते हे किरकोळ दहा-वीस हजारांचे काम असून, त्यास मंजुरी मिळणे अवघड नाही.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सहलीला गेलेल्या संचालकांचा ताफा मंगळवारी (दि.१८) मध्य प्रदेशातील एका धार्मिक ठिकाणी पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी (दि.१९) हा संचालकांचा ताफा सहलीवरून नाशिकला पोहोचणार असल्याचे समजते.
गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरीरोडवरील बाजार समितीच्या आवारात प्रशासकीय कार्यालयाला तसेच सभापती कक्षाला रंगरंगोटी काम सुरू करण्यात आल्याने त्याबाबत काही संचालकांनी आक्षेप घेतल्याचे समजते. या रंगरंगोटीच्या कामास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची किंवा बाजार समितीच्या संचालक मंडळाची कधी मंजुरी मिळाली याबाबत
बाजार समितीच्या वर्तुळात चर्चा सुरू होती. ४ जुलैला झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष बैठकीत एकूण १८ संचालकांपैकी बैठकीस उपस्थित १६ पैकी १५ संचालकांनी विद्यमान सभापती देवीदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यामुळे सभापती पदासह उपसभापतिपदाची निवडणूक २० जुलै रोजी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी जाहीर केली आहे.
होती. सभापतिपदावर शिवसेनेचे जिल्हा बॅँक संचालक शिवाजी चुंभळे यांनी दावा सांगितला असून, त्यांनीच बाजार समितीच्या डझनभर संचालकांना सहलीला नेल्याची चर्चा आहे. उपसभापतिपदासाठी संजय तुंगार, युवराज कोठुळे किंवा चंद्रकांत निकम यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होऊन त्यात माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या गटाचे १८ पैकी १५ संचालक येऊन सभापतिपदी देवीदास पिंगळे यांची, तर उपसभापतिपदी शंकरराव धनवटे यांची निवड करण्यात आली होती.३ वर्षांत तीन सभापती च्नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाचा कार्यकाळ एक वर्षाचा ठरवण्यात आला असून, पहिल्या वर्र्षी शिवाजी चुंभळे सभापती होणार आहेत, तर दुसऱ्या वर्षी भाजपाचे तुकाराम पेखळे आणि तिसऱ्या वर्षी विश्वास नागरे हे सभापतिपद भूषविणार असल्याची माहिती सहलीला गेलेल्या संचालकांनी दिली.