शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

निफाड तालुक्यात रंगला ग्रामपंचायत निवडणुकीचा फड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:23 IST

सुदर्शन सारडा ओझर : निफाड तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा फड चांगलाच रंगला आहे. तालुक्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १,१३१ उमेदवार रिंगणात आहेत.

ठळक मुद्देचुरस : ६० ग्रामपंचायतीसाठी १,१३१ उमेदवार रिंगणात

निफाड तालुका हा एके काळी सहकार सम्राटांचा होता. त्याचे बिरुद आता नामशेष झाले झाले असले, तरी राजकीयदृष्ट्या अतिशय सजग असणाऱ्या या तालुक्यात आताही ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस दिसून येत आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यात १४७ उमेदवार बिनविरोध निवडले गेले, तर ५२४ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सत्तेत असली, तरी निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्येच सामना बघायला मिळत आहे. गावगाड्याच्या राजकारणाला वेग आला असून, गल्लो-गल्ली, वाड्या-वस्त्यांवर बैठकांना जोर आला आहे. अण्णा, तात्या, मामा काका, भाऊ आणि तरुणांचे सोशल ग्रुप ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पॅनलची तोडफोड झाली आहे. आपल्याला उमेदवारी मिळाली नाही, म्हणून दुसऱ्या गटाकडे जाऊन उमेदवारी मिळविल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळते. दरम्यान, द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने चिंतेत भर टाकली असतानाच, ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले असून, गाव, वस्ती, वाड्या, शेत-शिवारात प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष पक्ष सहभागी नसले, तरी राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते-समर्थकांनी उमेदवारी केली असून, हे पक्ष निफाड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा फडकवा, म्हणून वाटेल ती मेहनत घेतानाचे सध्या तरी चित्र दिसत आहे. तालुक्यातील दावचवाडी, सुंदरपूर, सुभाषनगर, ओणे, नांदगाव या ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.प्रपंचातील निशाण्याजिल्ह्यात निफाडचे राजकारण वेगळ्या पद्धतीचे असते. सध्या संसारात दैनंदिन उपयोगी वस्तू याच निवडणुकीच्या निशाण्या झाल्या असून, त्यामुळे नेमकी कोणत्या गावात कोणती निशाणी बाजी मारते, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला!लासलगांव येथे होळकर-पाटील यांचेतील पारंपरिक सत्तासंघर्ष या निवडणुकीत पुन्हा बघावयास मिळणार आहे. मुंबई बाजार समितीचे संचालक‌ जयदत्त होळकर, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, माजी आमदार कल्याणराव पाटील, प्रकाश पाटील यांची भूमिका व राजकीय डावपेच महत्त्वाचे ठरेल. प्रदीर्घ काळ ग्रामपंचायत ताब्यात ठेवत काँग्रेसचा बालेकिल्ला बनविलेल्या उगांवला प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांचे बंधू भास्करराव पानगव्हाणे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब क्षीरसागार यांनाही त्यांच्या मायभूमी असलेल्या शिवडी गावची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोर लावावा लागत आहे. याचबरोबर, आदर्श गाव ठरलेल्या व राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत राहिलेले करंज गावातील खंडू बोडके पाटलांच्या सक्रियतेमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आली आहे. नैताळे येथील लढतही नेहमीच सोशल मीडियातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यात वाकबगार आहे. राष्ट्रवादीत स्थिरावलेले राजेंद्र डोखळेंना कोठुरेची गढी ताब्यात मिळण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. निफाड तालुक्यातील जिल्हा स्तरावरील नेत्यांचे गावातील गट अन‌ कार्यकर्ते सांभाळण्यासह आपापल्या सत्तांची पायाभरणी अधिक भक्कम करण्यासाठी नेतेमंडळींना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. तरुण उमेदवार ज्येष्ठांच्या शब्दाला किती प्रमाण देतात, हे बघणे रंजक ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत